सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०४.२०२०
महाबळेश्वर- कोरनाच्या पार्श्वभूमीवर भीमसैनिकांनी घरीच राहून भीमजयंती साजरी करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.दरवर्षी महाबळेश्वर मध्ये संघटनेच्या वतीने अतिशय जल्लोषात भीमजयंती साजरी केली जाते.यावेळी सर्व भीमसैनिक पहिल्यांदाच घरातून भीमजयंती साजरी करत होते.भीमजयंती निमित्त संघटनेच्या वतीने मिष्टान्न वाटप करून नागरिकांचा हा सण गोड करण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात आला.शहरातील साधारण १०० कुटुंबांना घरोघरी जाऊन संघटनेच्या स्वयंसेवकांनी मिष्टान्न वाटप केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे,तालुकाध्यक्ष सुमित कांबळे,गौरव काकडे,केतन जाधव,राहुल मोरे,अजिंक्य कांबळे,सागर कांबळे यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून उपक्रम यशस्वी केला.



















