मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०७.२०१९
नाहूर- नाहूर येथील राजगृह बुद्धविहार येथे बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेचा धम्म मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आपला समाज आपली जबाबदारी या अभियानाअंतर्गत चैत्य भूमी दादर, येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी संघटनेच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या तसेच आजवर संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा व भारतीय राज्यघटनेच्या लाखो प्रतीचे वाटप जनसामान्यांपर्यंत केल्या बद्दल सहभागी स्वयंसेवकांचा यावेळी “धम्मसारथी पुरस्कार २०१९” देऊन गौरव करण्यात आला.या धम्ममेळाव्यास मुंबई,ठाणे,पालघर,पुणे,बीड या जिल्ह्यातून संघटनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे व शुभांगी किरण शिंदे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.दीप प्रज्वलन हर्षवर्धन गंभीरे,भारत साळवे,अनिल जाधव,सुहास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.पंचशील व त्रिशरनाने कार्यक्रमास सुरुवात झाली धम्मचारी शिलरत्न दिपंकर व बौद्धचार्य सूर्यकांत साळवी यांनी धम्मविधी पार पाडला.उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संघटनेच्या कार्यबद्दल आपापली मते प्रस्तुत केली.यावेळी हर्षवर्धन गंभीरे मुंबई अध्यक्ष,भारत साळवे ठाणे अध्यक्ष,अनिल जाधव पालघर अध्यक्ष,सुहास शिंदे,अनिल मगरे,माणिक उमाळे,वेदांत मोरे,सूर्यकांत साळवी, इंजि.राजेश ढवळे,इंजि. अजय शिंदे,संदीप जोगदंड, सुमित गायकवाड,बीड जिल्हा अध्यक्ष प्रवीण जोगदंड,केतन जगताप,कुणाल जगताप,हिरा दलालकर,नंदकुमार जोगदंड,शुभांगी किरण शिंदे,ऍड. रजनी आगळे,पंकज कदम,यांनी आपापली मते मांडली.राजेश ढवळे यांनी सूत्र संचालन केले.उपस्थित स्वयंसेवक व समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे व शुभांगी शिंदे यांच्या हस्ते पुष्प व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.दुपारी स्नेह भोजनाचा सामूहिक आस्वाद घेण्यात आला.उपस्थितांना किरण शिंदे यांनी मार्गदर्शन केले.या पावसाळ्यात मुंबई,पुणे येथे बळी गेलेल्या नागरिकांना व तिवरे धरण दुर्घटनेमध्ये बळी गेलेल्या नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देण्यात आली.आभार अनिल जाधव यांनी मानले.तर कार्यक्रम संपल्याची घोषणा भारत साळवे यांनी केली.शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या कार्यक्रमास किरण शिंदे,शुभांगी शिंदे,हर्षवर्धन गंभीरे,भारत साळवे,छाया भारत साळवे,अनिल जाधव,सुमिधा अनिल जाधव,सुहास शिंदे,सुहासिनी सुहास शिंदे,अनिल मगरे,पंचशील अनिल मगरे,सूर्यकांत सखाराम साळवी,सुभाष आनंद चव्हाण, मनीषा सुभाष चव्हाण,माणिक उमाळे,संदीप जोगदंड,सुमित गायकवाड,नंदकुमार जोगदंड,गौतमी जोगदंड,आशिष जवंदाळे,शिलरत्न दिपंकर,मंदार पवार,केतन जगताप,साधना केतन जगताप,संदेश लाड,वैभव सावंत,राजेश घोलप,अनिल घोडके,दशरथ सावंत,ऍड.रजनी आगळे,सूचित सावंत, प्रतीक्षा सूचित सावंत, सारिष डोळस,संभाजी भोजने,इंजि.राजेश ढवळे, पंकज कदम,वेदांत मोरे,दीपिका गायकवाड,इंजि.अजय शिंदे,कुणाल जगताप,सुप्रिया कुणाल जगताप यांचेसह अनेक आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.या स्नेहसंमेलनास बच्चे कंपनीची उपस्थिती देखील लक्षणीय होती.मुसळधार पाऊस,मेगा ब्लॉक यांनी अडथळा निर्माण केला खरा पण याचा काहीही परिणाम उपस्थितीवर मात्र जाणवला नाही. मार्गदर्शन करताना किरण शिंदे यांनी एका व्हाट्स अप ग्रुप वरून चालू झालेला संघटनेचा थक्क करणारा प्रवास सांगितला.आज आपली ही संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहचल्याचा व समाजोपयोगी कार्य करीत असल्याचा अभिमान वाटतो हे आवर्जून नमूद केले.या संमेलना बद्दल सर्व स्तरातून संघटनेचे अभिनंदन होत असून येणाऱ्या काळात बुद्धिस्ट प्रेरणा गृप आंबेडकरी चळवळीतील पोकळी भरून काढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.



















