बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि. ०१. ०६.२०२२
आष्टी- देशात व राज्यात दिवसेंदिवस पेट्रोल , डिझेल , गॅस , जीवनावश्यक वस्तू शेती उपयुक्त साधन सामग्री , बांधकाम साहित्य व इतर सर्वच क्षेत्रात महागाई गगनाला भिडली असून बेरोजगारी वाढली असून व्यावसायिक व्यापारी शेतकरी सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे मेटा कुलीला आले असून महागाईवर केंद्र सरकार, राज्य सरकार कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेत नसून एकमेकांवर जबाबदारी ढकलून जबाबदारीतून मुक्त होण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत असून प्रचंड जीवघेण्या महागाईमुळे येथील जनता कमालीचे त्रस्त व संतप्त असून येथील राजकीय पक्ष धार्मिक वादाचे ध्रुवीकरण करून जनतेची महागाई , बेरोजगारी पासून लक्ष विचलित करण्याचा जाणून बुजून प्रयत्न करताना दिसून येत असून , महागाई व बेरोजगारीच्या निषेधार्थ दि. ३० मे २०२२ सोमवार रोजी आष्टी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . महागाई व बेरोजगारी वर त्वरित उपाय योजना केंद्र शासनाने व राज्य शासनाने न केल्यास राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष समस्त जनतेसह रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याचे निवेदनात जाहीर केले असून सदर निवेदन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या आदेशाने सादर केले आहे. या वेळ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष यांच्या समवेत अशोक निकाळजे, संजय जोगदंड, कमलेश जाधव, दादा गायकवाड, अतीक सय्यद, अविनाश जाधव, राम लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



















