नाशिक(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०४.२०२२
नाशिक- चांदवड तालुक्यामध्ये इतर तालुक्यांमधून भटके कुत्रे खूपच मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले आहेत या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव चांदवड तालुक्यातील दरसवाडी उर्दुळ या गावांना बघावयास मिळाला आहे
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पहाटेलाच पाच वाजता पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने प्रचंड उष्णतेने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांनी घराबाहेरच झोपणे खूपच मोठ्या प्रमाणात अंगलट आले आहे. पिसाळलेल्या एका कुत्र्याने त्यामुळे बाहेर झोपलेल्या शेतकरी कुटुंबाला धक्का दिला आहे यात तब्बल १२ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे त्यांना चांदवड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व रुग्णांवर चांदवड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांनी उपचार केले. या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात लहान बालके सुद्धा सुटले नाहीत. सुखदेव बडे वय वर्ष ४५ राहणार .दरसवाडी, ओम सचिन गवळी वय सहा वर्ष राहणार विजयनगर धोडंबे, संजय कारभारी नवले वय वर्ष४५, हर्षदा संदीप नवले वय दहा वर्ष, अरुण विष्णू नवले वय ४५ वर्ष, स्नेहल संदीप नवले वय आठ वर्ष, सार्थक रमेश ठाकरे वय १३ वर्ष, गोकुळ अशोक पवार वय ३५वर्षे, आर्यन सुनील ठाकरे वय सहा वर्ष, माधव फकिरा ठाकरे वय ३५ वर्ष, सुदर्शन संजय ठाकरे वय १५ वर्ष), हर्षद संजय ठाकरे वय १५ वर्ष चांदवड येथील रुग्णालयात उपचार घेत आहे



















