सागर पाटील (सातारा जिल्हा प्रतीनिधी)
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाटण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय बुथ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा शुभारंभ तथागत भगवान बुद्ध, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ लाहोटी यांनी शासनाच्या लोकाभिमुख योजना सर्वसामान्य, तळागाळातील लोकांपर्यंत कशा पोहचवीता येतील या बद्दल मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर यांनी पक्ष बांधणीसाठी पक्षाची विचारसरणी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलेली असेल तरच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य पर्यंत पोहचवणे सहज शक्य होईल असे मत व्यक्त केले. महिला जिल्हाध्यक्षा सौ कविता कचरे यांनी यावेळी कार्यकर्ता जडणघडणीसाठी विशेष मार्गदर्शन केले.जिल्हा सरचिटणीस महेंद्र डुबल, विस्तारक शेखर वडणे यांनी पक्ष वाढीसाठी, तसेच पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक सागर माने, युवा मोर्चाचे शिवाजी माने, संजय माने, अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत भिसे, अॅड. पराडकर,अनिल माने, साठे, काशिनाथ विभुते, यांच्या सह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.अनील बोधे यांनी स्वागत केले, समीर भोसले यांनी आभार मानले.



















