मुंबई ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
मुंबई : दि.१४.०८.१८ दिल्ली येथील जंतर मंतर येथे भारतीय संविधान जाळणाऱ्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांना त्वरित अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य शाखा मुंबई, ठाणे,पालघर, महाबळेश्वर यांच्या वतीने भांडुप,मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. निवेदनामध्ये संबंधित देशद्रोही समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून त्यांचेवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.संबंधित समाजकंटकांना त्वरित अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी किरण शिंदे (संस्थापक अध्यक्ष),सुमित गायकवाड,विकास ओव्हाळ,विजेंद्र गायकवाड,नंदकुमार जोगदंड,अजय शिंदे,ऍड रजनी आगळे(अध्यक्षा महिला आघाडी मुंबई), संघमित्रा गंभिरे(उपाध्यक्षा महिला आघाडी मुंबई),हर्षवर्धन गंभिरे (अध्यक्ष मुंबई)सुहास शिंदे (उपाध्यक्ष मुंबई),भारत साळवे (अध्यक्ष ठाणे),अनिल जाधव (अध्यक्ष पालघर),सूचित सावंत, अंकुश जाधव, सुरेश जाधव,विकास मस्के,रितेश मस्के, प्रथमेश कदम,प्रशांत साबळे, वेदांत मोरे,दिपक गायकवाड, अनिल मगरे,संजीवन सोनवणे,संतोष सोनवणे, सूर्यकांत साळवी,पंकज कदम, विवेक नाईक,सागर गांगुर्डे,राहुल यांच्यासह मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थित होते.



















