महाबळेश्वर ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, सुमित कांबळे
दि.१२.०८.१८
दिल्ली येथील जंतर मंतर येथे भारतीय संविधान जाळणाऱ्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांना त्वरित अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य शाखा महाबळेश्वर यांच्या वतीने महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांना दिले.निवेदनामध्ये संबंधित देशद्रोही समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून त्यांचेवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.संबंधित समाजकंटकांना त्वरित अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगीबुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य च्या महिला प्रदेशाध्यक्षा छायाताई शिंदे ,जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे,तालुकाध्यक्ष सुमित कांबळे,शहराध्यक्ष विद्यार्थी सेना अनिकेत मोरे, उपाध्यक्ष विध्यार्थी सेना पंकज कांबळे, सचिव अक्षय काकडे,मुस्लिम आघाडी अध्यक्ष जिशानभाई शारवान, सागर कांबळे,अजिंक्य कांबळे (मुंबई),श्रीरंग कदम,गंगाराम बाबू पाटील,आकाश खरे,रुपेश सपकाळ,सुनील घाडगे,प्रौढ साक्षरता वर्गाचे- रंजना कांबळे,जयश्री वाघमारे,अंजना कसबे,सुनंदा रोकडे, महिला आघाडी शहराध्यक्षा अनिता मोरे,स्वरा रोकडे,भारती मोरे,अरुणा काकडे,यांचेसह मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थित होते.



















