सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.२९.०६.१९
करमाळा- जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये तलाठी,कृषी अधिकारी,व ग्रामसेवक यांनी सज्जात निवासी रहावे या मागणी साठी दशरथ (आण्णा) कांबळे यांच्या नेर्तृत्वाखाली सोमवारी(१जुलै) तहसीलदार घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारिप तालुका अध्यक्ष सुभाष ओहोळ यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधींना दिली.
तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांनी मा.जिल्हा अधिकारीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आजवर आदेशाचे पालन केले नाही. हे सर्व कर्मचारी व अधिकारी आपआपल्या सोयी प्रमाणे राहत असल्याने सर्व सामान्य नागरीकाचे हाल होत आहेत. जिल्हा अधिकारी साहेबांच्या आदेशा नुसार संबधीत कर्मचारी व अधिकारी सज्जात निवासी राहिल्यास गौण खनिज,संपती,वाळूची चोरटी वाहतूक व प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्ष तोड थांबेल.राष्ट्राचा कणा माणला जाणारा शेतकरी राजा,शेत मजूर व सर्व सामान्य नागरीक यांना शासकीय यंत्रनेची माहीती व शासकीय योजनेचा लाभ त्वरित मिळेल.दैनदिंन व्यवसाय पाहून सर्व सामान्य जनतेचा अनमोल असा वेळ व पैसा वाचेल असे निवेदनात म्हटले आहे.या घेराव अंदोलनास भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील सर्व बहुजन बांधव मुस्लीम बांधव आलुतेदार,बलुतेदार बांधवानी उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे .सदरील विषय सर्वांच्या हिताचा असुन या आंदोलनास जिल्हा महासचिव शहाजी ठोसर,जिल्हा उपाध्यक्ष बाबा घोडके,शहर अध्यक्ष विशाल लोंढे,आप्पा भोसले,लहू भालेराव,दत्ता घोडके,विनोद शिंदे,दशरथ गाडे,भाऊ गायकवाड आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.



















