उस्मानाबाद(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,इम्रान मुल्ला
दि.२५.०९.१९
कळंब-तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दसऱ्यातील धुतलेले धुणं वाळत टाकण्यासाठी गेले असता घरावरील ३३ केव्ही लाईनच्या तारेला कपड्यांचा स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून गणेश मधुकर जाधव (वय 28) याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या विरोधात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.तसेच संतप्त ग्रामस्थांनी महावितरण विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा यासाठी कळंब पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. गणेश जाधव हा अत्यंत साधा आणि आध्यत्मिक होता.चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून त्याला तीन व दोन वर्षांचा दोन मुले आहेत.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,आई,वडील,भाऊ,भावजयीअसा परिवार आहे.त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गणेश जाधव हा गावातील भजनी मंडळातील शांत संयमी होता.त्याच्या निधनाची बातमी कळताच घरातील व्यक्तीसह गावाने हंबरडा फोडला त्यामुळे गावावर शोककळा पसरली असून महावितरण विरोधत संताप व्यक्त होत आहे.
◆ महावितरण विरुद्ध गुन्हा
दाखल करा
ग्रामस्थांच्या निवेदनाला कवडी किंमत देत केराच्या टोपलीत टाकणाऱ्या महावितरणच्या भोंगळ कारभरामुळे कांही महिन्यांपूर्वी खालिद शिकलकर यांचा जीव गेला तर आज गणेश मधुकर जाधव याचा जीव गेला आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उफाळला आहे दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.



















