लातूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०३.२०२०
अहमदपूर- तालुक्यातील हडोळाती येथील रहावाशी विजय दामोदर धूपे हे महावीरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर काम करतात. दि.२०मार्चला हंगरगा येथे वीजबिल वसुली साठी गेले असता गावातील जातीवादी गावगुंड विलास पवार, सुनील पवार, शिवमूर्ती पवार यांनी तूझे नाव काय व कुठला आहेस? विचारले, धुपे यांनी नाव व गाव सांगताच तु तर खालच्या जातीचा आणि आम्ही पाटील आमच्या कडून बिल वसुली करतो का? आरक्षणा मुळे नौकारीला आहेस नाही तर तुला शेण काढायला पण कोण ठेवणार नाही, परत गावात दिसलास तर पेट्रोल टाकून जिवंत जळू अशी धमकी देत काठीने जबर मारहाण करत सोन्याची साखळी, मोबाईल फोन, व २५००० (पंचवीस हजार रुपये) जबरदस्तीने काढून घेतले. यात धुपे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या बाबत अहमदपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. सदर प्रकार हा संतापजनक, चीड आणणारा असून माणुसकीला काळींबा फासणारा आहे असे परखड मत बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी व्यक्त केले असून सर्व आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.



















