पुणे (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०८.०९.२०२१
पिंपरी- पिंपरी चिंचवडच्या मोशी चिखली या गावामधुन मुक्तपणे प्रवास करणारी इंद्रायणी पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेवकाच्या प्रतापाणे धोक्यात आली असल्याची बातमी सध्या पिंपरी चिंचवड व महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, राहुल जाधव या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी महापौर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन अनधिकृतपणे मोठया यंत्रांचा वापर करुन इंद्रायणी नदीचा प्रवाह बदलला असुन नदीच्या पात्रातून अमर्याद व अनधिकृत पणे वाळू व मुरुमाचा अवैध उपसा चालविला आहे. इतकेच नाही तर या महाशयांनी नदीच्या पात्रातच बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन अवैध मार्गाने मोठी विहीर खोदली असून त्या विहीरीमधून देखील अवैध व अमर्याद पाणी उपसा करुन टँकरद्वारे पाण्याची विक्री राहुल जाधव करीत असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष गणेश साहेबराव सस्ते यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करुन केली असून सदर प्रकरणी महसूल विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, सदर नगरसेवकास पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी तात्काळ अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी निर्भीड पत्रकारशी बोलताना बुद्धिष्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी केली असुन लवकरच जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालया समोर सदर मागणीसाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे सुतोवात त्यांनी केले आहेत.
सदर घटनेची परिसरात एकच चर्चा असुन कठोर कारवाहीची मागणी स्थानिकाकडून होत आहे तर सोशल मिडीयावर या प्रकारणाचे व्हिडीओ धुमाकुळ घालत आहेत.