सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,प्रविण वाघमारे दि.३.११.१९
माळशिरस- तहसील कार्यालय माळशिरस येथे आ. राम सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माळशिरस तहसीलदार अभिजित पाटील यांनी तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे तालुक्यात झालेले पिकांचे नुकसान करिता शासना कडून तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल असे सांगितले. या करिता कृषी अधिकारी, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांनी तालुक्यातील झालेल्या पिकांची पंचनामा करून, पीकविमा अर्ज शेतकऱ्यांना कडून भरून तो सादर करून घ्यावे असा आदेश दिला, २ हेक्टरी प्रमाणे नुकसान भरपाई शासन कडून मिळेल. पीकविमा जिरायत ६८००, बागायत १३५००, फळबाग १८००० या प्रमाणे पीकविमा मिळेल असे सांगितले. यावेळी राम सातपुते यांनी शेतकऱ्यांना पीकविमा हा मिळवून देऊ, शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये. पूर्ण पंचनामा सादर झाल्यावर शासनाला सादर करून पीकविमा ची रक्कम मिळवून देऊ असे सांगितले. व इतर सर्व तालुक्यातील प्रश्नांना ही पूर्ण करू असे आश्वासन राम सातपुते यांनी दिले. तालुक्यातील सर्व शासकीय, प्रशासकीय विभागांना भेट देऊन त्याठिकाणी असलेले प्रश्न हे सोडवण्यासाठी प्रयत्न करीन. यावेळी माळशिरस तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल तहसीलदार काळे व सर्व पत्रकार उपस्थिती होते.



















