नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०४.२०२०
नाशिक- विद्यार्थी संघटना विविध सेवाभावी संस्था सरकार सोबत उभ्या असून काही मुद्यांवर आपल्याला अजूनही काम करण्याची गरज असल्याचे नाशिक जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन धनगे यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या पत्रव्यवहारात म्हंटले आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक जे लॉकडाऊन झाले,त्यामुळे त्याची परिणामी स्थलांतरित व रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांची समस्या अधिक तीव्र झाली आहे,हा सर्वात मोठा समाज घटक असूनही या समाजावर लॉकडाऊन चा किती मोठा परिणाम होईल याचा विचार राज्य सरकारने केला नाही ही वस्तुस्थिती आहे,रेल्वे स्थानकावर गरीब मजुरांची सोय करावी अशी मागणी जनार्दन धनगे यांनी केली आहे.याबत केंद्र सरकार यांच्याशी चर्चा करावी तसरच मुंबईच्या बाहेर मोकळ्या जागेत तात्पुरत्या छावण्या उभारता येतील का याचा विचार होणे गरजेचे असल्याचेहि धनगे यांनी सांगितले. राज्यातील पालावर राहणारा भटका विमुक्त समाज व अश्या प्रकारच्या इतर समाजाकडे रेशन कार्ड सारखे कोणतेही कागदपत्र नाही अश्यावेळी त्यांना रेशन कार्ड ची कसलीही अट न घालता सर्वाना धान्य उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी नाशिक जिल्हा विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन धनगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.



















