मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०७.१९
मुंबई-आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त क्रुतीसमीतीच्या विविध प्रलंबित मागण्यां संदर्भात आज मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दालनात {मंत्रालय. मुंबई} येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.रिक्षा चालकांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळाचे आठ दिवसांत गठन करुन कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आसुन सदर कमिटीमध्ये प्रशासकीय अधिकार्यांनबरोबरच रिक्षा चालकांचे तीन प्रतीनिधी म्हणून कृती समीतीच्या पदाधिकाऱ्यांना शिफारसीचे आधिकार देण्यात आले सदर कमिटी तीन महिण्यात कल्याणकारी मंडळाचा कृती आराखडा शासनाला सादर करेल सदर कल्याणकारी मंडळास जास्तीत निधी उपलब्ध करून देण्यात येईल.यातून रिक्षा चालकांना म्हातारपणी पेन्शन, सामाजिक सुरक्षा,आरोग्यविमा, मुलांना शिक्षणासाठी मदत या बाबीचा समावेश असेल.अवैध प्रवासी वहातुकीवर कारवाई करण्याकरिता कायमस्वरूपी भरारी पथक नेमण्याचे आदेश परिवहन खात्याला त्वरित देण्यात आले आसुन प्रादेशिक परिवहन कार्यालयां मार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.महाराष्ट्रातील मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या बेसुमार वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केले आसुन रिक्षा परवाना बंद करणे आवश्यक असल्याने सदरचा निर्णय त्वरित घेतला जाईल.तसेच रिक्षा भाडेवाढी संदर्भात चर्चा करताना सदर बाबत शासनाने हकीम समिती आणि खटुवा समितीची नियुक्ती केली होती त्यांनी भाडेवाढी सबंधित अहवाल शासनाला दिलेला आहे महागाई निर्देशांकानुसार भाडे वाढ देणे आवश्यक आसुन सदरचा निर्णय येत्या काही दिवसात घेण्यात येईल.ओला उबेर बाबत हे प्रकरण मा.न्यायालयात आहे यातील कायदेशीर बाबी तपासून रिक्षा चालकांचे उत्पन्न बुडणार नाही यासाठी प्रयत्न करू.
आटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र वतीने ९ जुलै पासून बेमुदत रिक्षा संप आंदोलन करण्यात आले होते मुख्यमंत्री यांनी चर्चे द्वारे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्या मुळे बेमुदत संप तूर्त स्थगित करण्यात आला होता परंतु आता मा.मुख्यमंत्री महोदय सोबत सकारत्मक चर्चा झाल्यामुळे तूर्त स्थगित केलेला संप या वेळी मागे घेण्यात आला त्यांची घोषणा शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांनी स्वतः रिक्षा चालकांच्या प्रश्नांसंदर्भात १ तासापेक्षा अधिक वेळ देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ निर्णय घेतल्या मुळे सर्व संघटना प्रतिनिधीनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मिटींगमध्ये ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, कृती समीतीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष प्रमोद घोणे मारुती कोंडे, शंकर साळवी, राज्य कार्यकारणी सदस्य आनंद तांबे, एलियाज लोधी खाण, पुणे कृती समितीचे प्रदीप भालेराव, बापू धुमाळ, दत्त पाटील, सुरेश जगताप, नवी मुंबई कृती समीतीचे सरचिटणीस सुनील बोर्डे, ज्ञानेश्वर कोळी, श्रीरंग जाधव, महाराष्ट्र रिक्षा पंचायत रायगड अध्यक्ष बाळा जगदाळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लखन लोंढे, बालाजी कांबळे ,यांच्या सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रिक्षा संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.



















