सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.०२.०७.१९
◆ महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी/विद्यार्थींनी सामजिक संघटना आक्रमक.
पाटण- आर्थिकदृष्ट्या (तस पाहिल्यास अनेक दृष्ट्या) मागास आणी इतर तालुक्यांपेक्षा ग्रामीण तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्याला अनेक प्रकारच्या शासकीय प्रकल्पांनी, केंद्रांनी व योजनांनी ग्रासलेल आहे. उदा.भूकंपग्रस्त,प्रकल्पग्रस्त,धरणग्रस्त, पुनर्वसनग्रस्त व सुशिक्षित बेरोजगारग्रस्त (काही गावे) पूरग्रस्त या सगळ्यांचा पाटण तालुक्यावर होणारा परिणाम म्हणून औद्योगिककरणाचा ऱ्हास आणी बेरोजगारीचा विकास तालुक्यात झाल्यामुळे तालुक्यातील तमाम जनता वरील सर्व प्रकारांनी अक्षरशः हैराण झालेली आहेत.याबाबत तालुक्यातील तरुण व होतकरू विद्यार्थी वर्गाने याबाबींवर अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा कारण ज्या प्रमाणे जन्म, जगणे आणी मृत्यू पावणे हे जसे निसर्गचक्र चालू आहे त्याचप्रकारे प्रत्येक पिढीतील कर्तुत्ववान मतदार होणे, कोणत्याही पार्टीचा,पक्षाचा किंवा संबंधीत पक्षाच्या,शेलचा,अध्यक्ष होणे किंवा मग बँक, संस्था, सोसायटी किंवा समितीचा अध्यक्ष होणे आणी स्वतः मरता मरता आपल्या गावात स्वतःचे वर्चस्व तयार करून आपल्या पार्टीचा ठेंभा मीरवण्यासाठी पुन्हा नव्या पिढीतील चार पोर आपल्याच मार्गावर आणून आपलाच नाद त्याला लावून आपण मरून जाणे असे हे चमच्या चक्र अलीकडच्या काळात जोरदार चालू आहे. पण आपण आता तरुण वर्गाने विचार करायला पाहिजे की चमच्या कितीही छोटा किंवा मोठा घ्या भाजीत घाला नायतर रशात घाला नाहीतर आणी कशा कशात घाला चमच्या मोठा असेल तर त्याच्या आकारामुळे फारतर त्याच नामांतर होईल मग त्याला पळी म्हणा डाव म्हणा किंवा उलातण म्हणा पण त्याच्या गुणकर्मानुसार त्याच्या पात्रतेत (लायकीत) मात्र फारसा नव्हे तर काहीच बदल होत नाही. किंवा बदल होऊ शकत नाही. असो मी हे उदाहरण येवढ्यासाठी दिले आहे की आता आपण तरुणांनी विचार करूनच ज्यांना राजकारणाची आवड आहे ज्यांना राजकारण समजत ज्यांना आपल्या सामाजिक धार्मिक आणी राजकीय घडामोडीची जाणीव झालेली आहे अशाच तरुणांनी ज्या संविधानाच्या जीवावर आपला राजकीय देश चालतो त्या संविधानाचा अभ्यास करत्या तरुणांनीच राजकारणात जाव कारण आपले सामाजिक मुद्दे सामाजिक न्याय हिताच्या मागण्या संविधानिक चौकटीत बसवून मा.विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मांडाव्या लागतात अशा अभ्यासू तरुणांनी राजकारणात आवश्य जाव परंतू सरसकट तरुणांनी जर राजकारणाचा मार्ग धरला तर पिढीन पिढी बरबाद होण्याच प्रमुख कारण ठरेल.
आपल्या मूलभूत हक्काच्या रोजगार निर्मितीसाठी लढायला शासनाशी झगडायला एक हक्काचा लढा उभारावा लागणार आहे कारण अखिल महाराष्ट्रात पाटण तालुक्यासारखी किमान रोजगाराबाबतची दैनीय अवस्था असणारा एकमेव तालुका म्हणजे पाटण तालुका असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही याबाबत आजवर होऊन गेलेल्या व विद्यमान असणाऱ्या लोक प्रतिनिधींच्या कार्यकाळावर ठबका निर्माण होतो.तसाच या तालुक्यातला मतदार हा आपल्या विकासाचा स्वहीताचा व भविष्याचा विचार न करता मत देणारा मतदार आहे एक ठपका तालुक्यातील मतदारावरती निर्माण होतो.परंतू आता हे कोळसे उगाळत बसण्याची वेळ नाही तर आजवरच्या नेत्यांना (मग ते माजी असतील किंवा आजी असतील) त्यांना जे जमल ते त्यांनी केल त्याबद्दल त्यांचे आमजनतेकडून आभार व जी काही काम राहिली असतील ते या दोनी नेत्यांना सुचवने व त्यांच्याकडून आपला आणी तालुक्याचा विकास साध्य करून घ्यायला पाहिजे व त्या नेत्यांच्या नेतृत्वाला आपण जनतेने समर्थ सात द्यायला पाहिजे हेच खरे शहाणपण ठरेल म्हणून महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी / विद्यार्थींनी सामाजिक संघटना शाखा पाटण तालुका यांच्या वतीने काही बाबी सुचवण्यात येत आहेत त्यातील पहिली बाब आहे ती म्हणजे आपला पाटण तालुका नैसर्गिक आणी अनैसर्गिक अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असणारा आपला हा पाटण तालुका आहे. उदा.भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, पुनर्वसनग्रस्त, सुशिक्षित बेरोजगारग्रस्त आणी (तालुक्यातील काही गावे) पूरग्रस्त अशा अनेक बाबींनी शासन मान्य ग्रस्त तालुका असल्यामुळे या तालुक्यातील कोणत्याही जाती धर्मातील पात्र विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात बौद्धिक व आर्थिक उन्नतीच्या सर्वच क्षेत्रात विशेषतः शासकीय क्षेत्रात कोणत्याही जातीचा निकष न लावता त्याला त्याच्या पात्रतेनुसार संबंधीत क्षेत्रात संधी द्यावी असा विशेष कायदा विधिमंडळात मंजूर करून घेवून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.दुसरी बाब म्हणजे पाटण तालुक्यातील कोणत्याही जाती धर्मातील तालुक्यातील रहिवाशी विद्यार्थीला प्राथमिक शिक्षणापासून ते सर्वोच्च शिक्षणापर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च हा सरकारने विनाशर्त करावा हा सुद्धा कायदा करून त्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.तिसरी बाब म्हणजे पाटण तालुक्यातील ज्या शिक्षण संस्थानमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्याकडून नियम बाह्य शिक्षण फी घेतली असेल / घेतली जात असेल अशा तालुक्यातील सर्व शिक्षण संस्थाची सविस्तर माहिती शिक्षण खात्याने मागवून संबंधीत शिक्षण संस्थांवर सरकारच्या वतीने खटले दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. चौथी बाब म्हणजे पाटण तालुक्यातील सर्व कॉलेजांमधून तालुक्यातील सुशिक्षित तरुणांची विद्यार्थी संख्या शासनाने विचारात घेवून त्यांच्या संख्येप्रमाणे तालुक्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये रोजगारीची संधी निर्माण करावी यासाठी विद्यमान आमदार, उत्कृष्ट संसदपट्टू मा.शंभुराजे देसाई आणी विद्यमान मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आणी विद्यमान शिक्षणमंत्री मा.विनोद तावडे यांना तालुक्याच्या व तालुक्यातील नागरिकांच्या वास्तवादी नितांत गरजेच्या वरील मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी / विद्यार्थींनी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व त्यांचे शिष्ट मंडळ देणार असल्याचे सदर संस्थेचे तालुका अध्यक्ष मा.विठ्ठल कळके यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे. अशा स्वरूपाच्या किमान येवढ्या तरी आतापूर्त्या आमच्या मागण्या असून सदर मागण्याची पूर्तता करण्यात यावी.यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी / विद्यार्थींनी सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



















