मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर महापालिकेत गोंधळ; आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१५.०७.२०२६
पिंपरी- मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात बुधवारी विविध सामाजिक संघटना व विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह (मनसे, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी “कचरा चोरी करणाऱ्या आमदार महेश लांडगे यांचा धिक्कार असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत व जखमी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.



















