सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अनिल माने
दि.८.१२.१९
पाटण- हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशा मागणीचे महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी विध्यार्थींनी सामाजिक संघटना,शाखा पाटण यांचे तर्फे निषेध रॅलीने निषेध व्यक्त करून मा.तहसिलदार सो पाटण यांना निवेदन देणेत आले.या प्रसंगी युवा विद्यर्थी व विद्यार्थिनीमध्ये अन्याया विरूध आवाज उठवण्याची जागृती व तळमळ असल्याचे प्रचंड जानवत होते अश्या प्रतीची जाणीव-जागृती दरेकत निर्माण झाल्यास गुन्हेगारांना जरब बसल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री झाल्याचे काहींचे मत निर्माण झाले. तसेच सदर युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.शुभमजी उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हंनाले की आपली युवा संघटना कोणत्याही प्रकारच्या अन्याया विरुद्ध आवाज उठवण्यासाठीच निर्माण करनेत आली असून या संघटनेचे सभासद बनून आपण या संघटनेची ताकत वाढवा म्हनजे अशा स्वरुपाच्या किंव्हा कोणत्याही स्वरुपाच्या अन्याया विरूध आवाज उठविता येईल तसेच या घटणेबाबद जे जे आरोपी दोषी असतील त्या आरोपींना मरेपर्यंतच्या मृत्यू दंडाची शिक्षा देणेत यावी अश्या स्वरूपाची आपले म्हणणे सदर संघटनेने विद्यमान सरकारला व न्यायव्यवस्थेला निवेदन पत्राने कळविले असून याबाबद कोणत्याही प्रकारे हलगर्जीपना करू नये अन्यथा आम्हाला उग्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असेही मा.शुभमजी उबाळे म्हणाले या प्रसंगी कुमारी शुभांगी पाटील , शिवानी सोनवले, पूजा भिसे, तेजस्विनी मोरे, प्रतीक्षा साळुंखे, सेजल घाडगे, या रणरागिनी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या तसेच साळुंखे हायस्कूलचे मा.शिंदे सर संघटनेचे पदाधिकारी प्रथमेश भिसे, शुभम दाभाडे, साई बोलके, ओंकार भिसे, विशाल भिसे, शंकर सुतार, आणि सर्व कार्यकर्ते यांनी निषेध मोर्च्या रॅली यशस्वी करून अन्यायाचा प्रतिकार केल्या बद्दल सदर संघटनेचे व त्यातील सर्व पदाधिकार्यांचे सर्व स्थरावर कौतुक होत आहे.



















