चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश्वर शेंडे
दि.१९.०६.१९
नागभीड- तालुक्यातील येनोली माल येथे गट ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. सध्या खरिप हंगाम तोंडावर असताना पानटपरीवर निवडणूकच्या चर्चेला उधाण उधाण येत असून माझा उमेदवार निवडून आल्या शिवाय राहणार नाही,असल्या प्रकारची खमंग चर्चा ऐकू येत आहे.
काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपाच्या उमेदवाराने बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणूक तसेच सार्वत्रिक निवडणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे.ग्रामपंचायत सार्वत्रिक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले आहे.
येनोली येथील मतदार थेट सरपंच मतदानातून जनते मधून निवडणार आहेत. नागरिकांचा खुला प्रवर्ग राखीव सरपंच असल्यामुळे तीन येनोली (माल) व धामणगाव चक मधुन एक असे एकुण चार उमेदवार सरपंच पदासाठी उभे आहेत,मात्र सरपंच पदासाठी दुहेरी लढत होणार असे मतदारांना वाटत आहे, पण तीन उमेदवार हे OBC प्रवर्गातुन असुन त्यांच्या शर्यतीत अनु.जाती प्रवर्गाचा सुद्धा एक सरपंच निवडणुच्या रंगनात आसनार आहे. २३ जून रोजी निवडणूक पार पडणार असून त्यानंतर लगेच निवडणूक निकाल घोषित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पेरणीच्या तोंडावरच हि निवडणूक पार पडणार असल्याने गावांतील अनेकांचा राजकीय हिरमोड होत आहे.
शेती हंगामात उमेदवारांची दमछाक ऐन खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर ग्रामपंचायत निवणूक होत असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे. शेती कामे करून निवडणूक प्रचार करावा लागत असल्याने उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निवडणुकी चिन्ह मिळताच कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत, निवडून येणाऱ्या उमेदवार ला ग्रामपंचायतीच्या गावपुढाऱ्यांना सदर निवडणुकीचा निश्चितच फायदा होणार आहे. तसेच ग्राम पंचायत सदस्य पदासाठी सुद्धा एकुण १८ उमेदवार रिंगणात आहेत.



















