नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०४.२०२०
येवला- जागतिक समस्या बनलेले कोरोनाचे संकट हे परतून लावण्याचे काम हे आज डॉक्टर , नर्स , शासन प्रशासन असेल ह्या सगळे ऊत्तम रीतीने करत आहे,
कोणताही परिस्थितीत हे संकट परतून लावण्याचे काम आज प्रत्येक व्यक्ती करतो आहे. भारताची आजची करोनाची लोकसंख्या ही चार हजारावर जाऊन ठेपली असून शासन यावर सर्वांना आव्हान करत आहे घराबाहेर जाऊ नका नियमांचे पालन करा त्याच बरोबर गावाचा इतिहास हा खूप मोठा असतो त्यामध्ये लहानपापासून ते मोठ्यांपर्यंत हा चाललेला वारसा गाव आणि गावाची लोक पुढे नेत आहे. येवला तालुक्यातील सावरगाव येथील अंगणवाडी तसेच आरोग्य क्षेत्रातील महिला, सामाजिक कार्यकर्ते घरोघरी करोना सर्वे करत आहे, लोकांना आरोग्य विषयक माहिती देत आहे जनजागृतीबाबत लोकांना हात वेळेवर स्वच्छ आणि सॅनिटायझर ने हात स्वच्छ करावे तोंडाला मास्क वापरावे बाहेर जाणार असाल तर मास्क वापरावे हँड ग्लोज वापरावे, गॉगल वापरावे , जेणेकरून करोना संसर्गजन्य लोकांना होणार नाही प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी, स्वयंसेविका सीमा घोडेराव यांनी जनतेला हा संदेश दिला की कामानिमित्त बाहेर जा अन्यथा बाहेर जाऊ नका हात सॅनिटायझेर ने धुवा नसेल सॅनिटायझेर तर घरात अंघोळीचा साबण आहे त्याने स्वच्छ धुवा , बाहेर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आलात तर आरोग्य विभाग कर्मचारी असेल पोलीस असेल यांना संपर्क साधावा, स्टे होम स्टे सेफ हा संदेश दिला त्याचबरोबर घरोघरी जाऊन जनतेला संदेश व सर्वे करता वेळी सोबत सावरगाव येथील आशा स्वयंसेविका, सीमा पिंटू घोडेराव अंगणवाडी कार्यकर्ती द्वारकाबाई काटे , चंद्रकला गोविंद ,आरोग्य सेविका मीना जानराव सामाजिक कार्यकर्ते सागर घोडेराव उपस्थित होते.



















