नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,महेश दारुंटे
दि.२३.११.१९
येवला- या वर्षी जिल्ह्यात ६८ हजार २२६ हेक्टर वर लाल कांद्याची लागवड झाली होती. परंतु, परतीच्या पावसाने ५४ हजार ४०८ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाल्याने फक्त १३ हजार ८१८ हेक्टर वर कांदा शिल्लक राहिलेला आहे. दरवर्षी दासऱ्यापासून बाजारात येणारा कांदा मात्र ह्या वर्षी डिसेंबर मध्ये बाजारात येणार असल्याने तूर्तास आवक मोठ्याप्रमाणात घातली असून येवला बाजार समितीत उन्हाळा कांद्याचे रेकॉर्ड भाव आठ हजार मिळाला. यापूर्वी २२ ऑगस्ट २०१५ ला येवल्यात ६५०० चा भाव मिळाला होता. जिल्ह्यात दहा बाजार समित्यांत ही ६५०० ते ७००० हजारपर्यंत विक्रमी भाव होते. आतापर्यंत डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात लाल कांद्याची आवक मोठी होत असल्याने दर पडून शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येत होती. परंतु ह्या वर्षी मात्र परतीच्या पावसाने सर्व चित्रच बदलून टाकलेले आहे, तर शहरी भागातील गृहिणीच्या डोळ्यात कांद्याच्या दराने अश्रू तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाआश्रू कित्तेक वर्षा नंतर बघायला मिळाले. कित्तेक वर्षापासून शेतकरी हा डोळ्यात अश्रू घेऊन जगत होता. परंतु ह्या वर्षी मात्र त्याच्या डोळ्यातील अश्रू काही प्रमाणात कमी झाले आहे. देशात कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने ग्राहक हित डोळ्यासमोर ठेऊन कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून १ लाख २० हजार मेट्रिक टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या चीन व इजिप्त मध्येच कांदा असल्याने या दोन्ही देशांमधील कांदा भारतात येण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागतात. त्यामुळे या दोन्ही देशांतील कांदा दुबई येथे विक्रीला येतो. दुबई वरून भारतात कांदा येण्यासाठी ५ दिवस लागतात. दुबई मार्गे कांदा भारतात आला तरी ती बाजारात येण्यासाठी किमान १० दिवस लागण्याची शक्यता आहे. तर या आयात केलेल्या कांद्याचे दर ग्राहकांसाठी परवडणारे असतील.



















