नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०३.२०२०
येवला- बाटलीत पेट्रोल बंद करण्याचा निर्णय योग्य असला तरी याची सर्वात जास्त झळ शेतकऱ्यांना बसू लागली आहे. ग्रामीण भागाकडे गाडीचे पेट्रोल रस्त्यातच संपून बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. गाडी थेट पेट्रोल पंपा पर्यंत लोटत घेऊन जावी लागते. गंभीर प्रश्न म्हणजे पिकावर औषध फवारणीचे पंप देखील पेट्रोल वरती चालतात. पण बाटलीत पेट्रोल मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांनी फवारणी करावी कशी ? हा प्रश्न पडत आहे. यावरतून पेट्रोल पंप कर्मचारी व शेतकरी यांच्या तुझी-माझी होताना पहायला मिळत आहे. पंरतू
पेट्रोलच्या दुरुपयोग होत असल्याच्या घटना घडल्याने पोलीस व प्रशासनाने बाटलीत पेट्रोल न देण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्याने त्याची जिल्हाभरात काटेकोर अंबलबजावणी सुरू आहे. शहरी भागात जास्त प्रमाणात अडचणी नसल्या तरी ग्रामीण भागात या निर्णयाने एकपेक्षा अधिक अडचणी येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीचे पंप घेऊन थेट पेट्रोल पंपाची वाट चालावी लागत आहे. पंपासाठी तरी पेट्रोल बाटलीत द्यावे यासाठी शेतकरी व पेट्रोल पंप चालक यांच्यात बाचाबाची होताना दिसत आहे. औषध फवारणी पंपास पेट्रोल भरण्यासाठी शेतकरी या वर्षीपर्यंत बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन येत होता. त्यामुळे फवारणीचा अडचण होत नव्हती. प्रशासनाने बाटलीत पेट्रोल द्यायचे बंद केल्याने शेतकऱ्यांनी पेट्रोल पंप घेऊन थेट पेट्रोल भरण्यासाठी पंप गाठला आणि पेट्रोल भरून द्या असे सांगतात. तेव्हा पेट्रोलपंप चालकांना प्रश्न पडतो की पेट्रोल भरून द्यायचे की नाही.
काही पेट्रोलपंप धारकांनी आता ड्रम मधे डिझेल भरून देण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे शेताकडे विजेअभावी डिझेल इंजिन वापरले जातात. त्यामुळे त्या इंजिंसाठी डिझेल आणायचे कसे. हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही निवडक शेतकरी ट्रॅक्टर मधे डिझेल भरून आणतात आणि नळीच्या साह्याने ते काढतात. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे चार चाकी वाहन नाही त्यांनी इंजिन साठी डिझेल आणायचे कसे. शेतकऱ्यांनी हट्ट करून मागणी केल्यास पेट्रोल पंप चालक लगेचच प्रशासनाचा निर्णय दाखून हात वरती करतात. या सर्व अडचणीतून पोलीस प्रशासन यांनी योग्य पर्याय काढावा अशी मागणी शेतकऱ्यां कडून होत आहे.



















