सातारा (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०१.२०२१
महाबळेश्वर- शहर हद्दीतील रांजणवाडीकडे जाणाऱ्या रोडवर जीवन प्राधिकरणची पिण्याचे पाणी वाहून नेणारी लाईन गेल्या ३ महिन्यांपासून फुटलेली आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाय या पाणी गळतीने रहदारीचा रस्ता देखील वाहून गेला असून रस्त्यात खड्डे निर्माण झाले आहेत.सदर रस्त्यावर चिखल पसरला असून त्यामुळे रस्त्याने जाणारी दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत.वारंवार तक्रार देऊन नगरपालिका काहीच कारवाई करत नसल्याने आता तक्रार करावी तरी कोठे हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.तर लवकरात लवकर ही पाणी गळती दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
“एकीकडे पाणी म्हणजे जीवन”,पाणी वाचवा जीवन वाचवा असा मंत्र दिला जातो आणि एकीकडे असे पिण्याचे पाणी वाया जाते तरी कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



















