चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
चिमूर- श्री.संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज यांची जयंती चिमूर येथील मूक बधिर विद्यालय येथे साजरी करण्यात आली, या वर्षी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामधे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या समावेश करण्यात आला. चिमूर येथील श्री.राष्ट्रसंत तुकडोजी मूक बधिर विद्यालयात श्री संत संताजी जगनाड़े महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडीचे चंद्रपुर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक रामदास कामडी उपस्थित होते. संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या १४ ताळकर्यांपैकी एक प्रमुख ताळकरी होते, तुकाराम महाराज यांनी ज्या रचना रचल्यात त्या सर्व रचना संताजी जगनाडे महाराज याना मुखपाठ होत्या, इंद्रायणी नदीमधे बुडविलेल्या गाथा लिहन्याचे कार्य संताजी जगनाड़े महाराजांनी केले, तेली समाज संताजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो त्यामुळे संताजी महाराज सम्पूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाने शासकीय परिपत्रकामधे जयंतीच्या समावेश केला,
या वेळी राष्ट्रसंत मूकबधिर विद्यालयतिल विधायर्थयानी सुधा संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण केली, विध्यार्थांना खाऊ वाटप करूंन कार्यक्रमची सांगता केली. यावेळी मुख्याध्यापक रामदास कामडी, सहाय्यक शिक्षक धर्मदास पानसे, पटवारी कोहपरे, ताराचंद बोरकुटे, अशोक विभूते उपस्थित होते.



















