मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.४.११.२०२२
मुंबई- भारतासह अनेक देशांच्या प्राचीन लिपींचे जाणकार, प्रो.डॉ. अनिर्बाण दश यांची नुकतीच राष्ट्रीय पांडुलिपी मिशन अर्थात National Mission for Manuscripts या संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. प्राचीन भारताच्या जवळपास ३५ लिपींचे जाणकार असलेल्या डॉ. दश यांनी भूतान, चीन (तिबेटसह), श्रीलंका, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, मलेशिया, जर्मनी, कोपेनहेगेन, जपान आणि डेन्मार्क देशांत अनेक प्राचीन हस्तलिखित ग्रंथांचे लिप्यांतर कार्यशाळा घेतल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभागात ते काही काळ कार्यरत होते नंतर सारनाथ येथील सेंट्रल इन्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज येथे कार्यरत होते. जगभरातील ८० विद्यापीठांत त्यांनी भारतातील प्राचीन लिपींवर कार्यशाळा घेतली आहे. डॉ.दश यांनी “इयं धम्मलिपि”, “शारदा लिपि” ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. सध्या ते संस्कृत बौद्ध शब्दांची पुस्तिका तयार करीत आहेत. नाशिकमध्ये देखील प्राचीन लिपींवर अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. भारताच्या प्राचीन लिपींचे संवर्धन करणाऱ्या मानद संस्थेवर डॉ.अनिर्बाण दश यांची नियुक्त झाल्याने, त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.



















