◆ चिंचवडेनगर येथे रिक्षा स्टॅन्डचे उदघाटन
पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.०३.०६.१९
पिंपरी- प्रत्येक घटक संघटित होत आहे संघटित होऊन संघर्ष केल्यास आपल्या मागण्यांना न्याय लवकर मिळतो. रिक्षा चालकांनी महाराष्ट्र रिक्षा पांचयत संघटनेच्या नेतूत्व खाली संघटित व्हावे आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करावा हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते माऊली सूर्यवंशी यांनी केले.
चिंचवडनगर वाल्हेकर वाडी येथे महाराष्ट्र रिक्षा पांचयत संलग्न चिंचवडे नगर रिक्षा स्टॅन्डचे उदघाटन माऊली सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र रिक्षा पांचयत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे होते. या वेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे फैजदार सोमनाथ झेंडे,माजी नगरसेवक संदीप चिंचवडे,भारत केशरी विजय गावडे,सामाजिक कार्यकर्ते गजानन चिंचवडे बाजीराव चिंचवडे,हरीभाऊ चिंचवडे,टेल्को युनियन अध्यक्ष शिवाजी शेडगे,योगेश चिंचवडे, संजय येवले,महेश जाधव, महाराष्ट्र रिक्षा पांचयत पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे,प्रल्हाद कांबळे,पोलीस हवालदार सचिन वरणेकर,पोलीस मित्र संघटनेचे मधुकर साठे आदी उपस्थित होते.
या वेळी रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले रिक्षा चालकांचे स्थानिक आणि राज्यपातळीवर अनेक प्रश्न आहेत.हे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पांचयत काम करत आहे, संघटनेनं रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवल्या मुळे रिक्षा चालक मोठ्याप्रमाणात संघटने सोबत जोडले जात आहेत संघटनेचे रिक्षा स्टॅन्ड वाढत आहेत,सर्वात जास्त सभासद असलेली संघटना म्हणून महाराष्ट्र रिक्षा पांचयत नावा रुपाला येत आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष दिनेश चिंचवडे,अशोक डोरे,सूर्यकांत फुगे,कैलास चिंचवडे,अजित विधाते,राजू वाघमारे,अनिल कोळसुने यांनी परिश्रम घेतले.



















