मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०१.२०२२
नेरूळ- रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आंबेडकर) पक्षाच्या राज्य संघटकपदी कैलास जोगदंड यांची निवड झाली आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जोगदंड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनेक वर्षापासून जोगदंड विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत, त्यांच्याकडे संघटन कौशल्याचा दांडगा अनुभव आहे.रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे महाराष्ट्र पदाधिकारी यांनी जोगदंड यांचे सामाजिक, धार्मिक कार्य पहाता यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दिपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले आहे. या वेळी पक्षाच्या राष्ट्रीय माहिला अध्यक्षा सौ.सुनिताताई चव्हाण, कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिव ससाणे, सुनिल धायजे, नाना पवार, राहूल कांबळे, जगदिश मदाळे, नितीन जोगदंड, उपस्थित होते.



















