सांगली (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनीधी,
सांगली- जिल्ह्यातील कडेगाव एमआयडीसीतील उद्योजक महिलेला कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र (कन्सेंट लेटर) देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेताना सांगली एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हािकारी स्वाती संतोष शेंडे यांच्या सह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. उद्योजक महिले च्या पती कडे शेंडे यांच्यासह सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष मारूती माळी आणि कंत्राटी कर्मचारी सुनील भूपाल कुरणे यांनी ५ हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईने महसूल आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. शेंडे यांची प्रशासकीय कारकीर्द नेहमीच संशायाच्या भोवर्यात सापडली आहे. पोलिस उपायुक्त राजेंद्र बनसोडे, सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, जितेंद्र काटे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, अश्विनी कुकडे, राजेंद्र धुमाळ, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने कारवाई केली.



















