नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०५.२०२०
येवला- शहरात गेल्या काही दवसांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. शहर परिसरात दिवसाचा पारा चढता असून वाढत्या उष्णाने येवलेकर हैराण होत असताना त्यात विजेच्या लपंडावाची भर पडत आहे. त्यामुळे वृध्द व्यक्ती लहान मुले व दमेकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. सुरळीत वाटणारा वीजपुरवठा खंडित व्हायला सुरुवात झाली की तासाभरात किमान पाच ते सहा वेळा खंडित होतो. त्यामुळे शहरवासीयांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचार बंदी लागू असताना घरात रहा सुरक्षित रहा असे आव्हान प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र वाढत्या उष्म्यात विजेअभावी शहरवासीयांच्या जीवाची काहीली होत आहे.



















