बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, चंद्रकांत मोरे
आष्टी, तालुक्यातील खिळद येथील बाबुराव आश्रुबा गर्जे (वय २०) या तरुण शेतकऱ्याचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही घटना (बुधवारी दि.३१)रोजी दुपारी घडली. शेतातील ऊसाला आग लागल्याने आग विझवण्यासाठी बाबुराव धावत असताना याच वेळी शेतातून गेलेली विद्युत तार तुटून खाली पडली होती. ही तार नदिसल्यामुळे तारेच स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. सदर मृत्यू देहाची उत्तरीय तपासणी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. या प्रकाराने परिसरातील वातावरण शोकाकुल असुन हळहळ व्यक्त केली जात आहे.



















