विश्रांतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणार
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, सुमित गायकवाड
दि.११.११.२०२४
⬛ आमदार सुनिल टिंगरे येरवडा, विश्रांतवाडी भागात प्रचार दौरा
पुणे- विश्रांतवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला जाईल असे आश्वासन वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांनी दिले.
आमदार सुनील टिंगरे यांनी येरवड्यातील आंबेडकर सोसायटी फुलेनगर, शांतीनगर, प्रतिकनगर भागात पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. या भागात आमदार टिंगरे यांनी केलेल्या विविध विकास कामांमुळे परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचार दौर्यात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या भागातील विविध समाज मंदिरासाठी तसेच येथील समस्या सोडवण्यासाठी आमदार टिंगरे यांनी सातत्याने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रचारात नागरिकांनी या कामांचे कौतुक केले.
यावेळी आमदार टिंगरे म्हणाले, येरवडा, विश्रांतवाडी भागात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची शहरातील सर्वात मोठी मिरवणूक विश्रांतवाडी येथे होत असते. त्यामुळे येथील मुं़कुंदराव आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. माझ्या वचननाम्यातच हे आश्वासन मी दिले आहे.
याशिवाय मनोरुग्णालय वसाहतीमध्ये सभामंडप, शौचालय, आंबेडकर वसाहत, पंचशीलनगर, प्रतीकनगर भागातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी वाहिन्या, त्रिरत्न बौद्ध विहाराचे बांधकाम, विविध समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून देणे, अशी कामे या भागात केल्याचे टिंगरे यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले.
शांतीनगर भागातील पुरपरिस्थिती रोखण्यासाठी कायम स्वरुपी उपाय योजना करण्याचे आश्वासनही आमदार टिंगरे यांनी दिले. या पदयात्रेत माजी नगरसेविका शितल सांवत, अजय सावंत, मंग़ेश गोळे, सुभाष चव्हाण, भगवान जाधव, सागर कांबळे, राहूल जाधव, आनंद शिंदे, सिध्दार्थ कांबळे, अरविंद चव्हाण, अरविंद गुजर, दाजी शेटकर, महमुद खान, सुरेश नायर, संदिप पवार, भुषण सोनावणे यांच्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



















