नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, महेश दारुंट
दि.०५.०३.२०२०
येवला- इतर वाहना सोबत धावू शकणारी सायकल तीही कुठल्याही इंधनाशिवाय, अशी कल्पनाच करणे जगावेगळी आहे ना ! मात्र येवला येथील मातोश्री तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी सायकल बनवली असून त्यांचा हा प्रयोग राज्यस्तरीय स्पर्धेत कौतुकाचा ठरला आहे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटर वरतून सायकल वरती शाळेचा प्रवास करावा लागतो. शाळेचा प्रवास सुखकर करण्यासाठी धानोरा येथील मातोश्री तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांनी सौऊर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे. मॅकेनिकल शाखेतील विद्यार्थी स्वप्नील वाबळे, राहुल खकाळे व दीपक ठोंबरे यांनी फक्त आठ हजारात आपली संशोधकलेला चालना दिली. सायकल साठी ड्रायलिड अॅसिड बॅटरी, रिले, एम.सी.बी. डी सी ब्रश टाईप मोटर, स्वीचेस,डिजिटल स्पेडोमिटर मॅग्नेटिक सेन्सर, मिनीएचर, सर्किट ब्रेकर हे उपकरण वापरण्यात आले आहे. बॅटरीची ऊर्जा डीसी मोटारच्या साहाय्याने विशिष्ट गिअर प्रणालीला देऊन २७० आर.पी.एम. च्या वेगाने सायकल ला गती दिले जाते. एकदा चार्ज केल्यावर सायकल किमान २५ किलोमीटर अंतर पार करू शकते. बटणाच्या साहाय्याने सायकल बॅटरी किंवा पुन्हा मूळ पैँडल मारण्याच्या प्रक्रियेवर बदल केला जाऊ शकतो. ही सायकल पूर्णपणे पर्यावरण पूरक असून इंधनावरील होणारा खर्च आपण बाचाऊ शकतो.



















