चंद्रपुर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी विकास खोब्रागडे
दि.१६/०८/२०१८
अभ्यंकर मैदानात शहीद बालाजी रायपूरकर, नागफणा हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले.
शासकीय हुतात्मा स्मारक,राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण कार्यक्रमाला जिल्हाभरातून लाखोंची उपस्थिती
- चिमूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूरची क्रांती सुवर्ण अक्षराने नोंदविली आहे. पारतंत्रातही स्वातंत्र्याचा पहिला झेंडा चिमूरमध्ये फडकला. यासाठी कित्येक लोक शहीद झाले. या शहिदांना व स्वातंत्र्यविरांना नमन करण्यासाठी आल असून चिमूर क्रांती शहिदांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यासाठी या क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी आयोजीत केलेल्या शहीद स्मृती दिन सोहळा २०१८ या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री अम्बरीशराव आत्राम, खा. अशोक नेते, आ. मितेश भांगडिया, आ. नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी राज्यमंत्री संजय देवतळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, माजी आमदार शोभाताई फडणवीस,चंद्रपुरच्या महापौर, अंजली ताई घोटेकर,चिमूरच्या माझी नगराध्यक्ष शिल्पा राचालवर,व प्रशासनातील अधिकारी व मान्यवर आदी उपस्थित होते. चिमूर येथील क्रांतीकारकांनी केलेली क्रांती भारत कधीही विसरणार नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी याना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करन्यात आली,लगेच ते दिल्ली ला निघाल सर्व लोकार्पण भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आले, यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चिमूर शहीद स्मृती दिनावर त्यांनी आपले सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओ वरून चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. यावेळी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची समायोजित भाषणे झाली.त्यांनी माना समाजाच्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा विषय सुध्दा आमचे सरकार निकाली काढेेल असा शब्द दिला. संचालन शेख यांनी केले चिमूर क्रांती वर चल चित्रपट दाखविण्यात आला.



















