सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०४.२०२०
करमाळा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत निमगाव (ह) च्या वतीने गावातील सर्व नागरिकांना मोफत हॅन्डवॉश वाटप करण्यात आले. ग्रामपातळीवरील सर्व यंत्रणा जिवाची पर्वा न करता. दिवस-रात्र कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता. त्या प्रमाणे या रकमेचे वितरण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे. सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, यांना ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार. तसेच जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आवाहनानुसार कृषी विभागाच्या वतीने गावातील दानशुर शेतकरी यांच्याकडून धान्य जमा करून. वरिष्ठ कार्यालयात पोहोच केले. पोलीस स्टेशन करमाळा यांच्या आदेशानुसार गावात जनजागृती करण्यात आली. गावातील आजारी व्यक्तींची तपासणी करण्यात आली. गावातील गरीब व गरजू, तसेच विधवा यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याकामी गावातील सर्व नागरिक, ग्रामसेवक मनोज अंगद लटके, आरोग्य सेविका निकुंभ मॅडम, कृषी सहाय्यक चव्हाण, तलाठी गवळी भाऊसाहेब, यांनी विशेष सहकार्य केले. तसेच उपसरपंच सर्व सदस्य गावातील तरुण मंडळ यांनी मदत केली. येथून पुढेही असेच सहकार्य करतील असे आश्वासन सतिश मधुकर नीळ-पाटील सरपंच प्रतिनिधी, ग्रामपंचायत निमगाव (ह) यांनी दिले व सर्व नागरिकांना घरात राहण्याची विनंती केली.



















