सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.३.०१०.१९
सातारा- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.त्याला राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता टीईटी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी मधे ही परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषद करत आहे.गेल्या वर्षी १५ जुलैला ही परीक्षा झाली त्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षा घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.मात्र त्याला मान्यता मिळाली नाही.त्यामुळे परीक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.प्रलंबित टीईटी घेण्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्यामुळे आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात टीईटी घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.सातारा- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.त्याला राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता टीईटी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी मधे ही परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषद करत आहे.गेल्या वर्षी १५ जुलैला ही परीक्षा झाली त्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षा घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.मात्र त्याला मान्यता मिळाली नाही.त्यामुळे परीक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.प्रलंबित टीईटी घेण्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्यामुळे आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात टीईटी घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.



















