पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.१२.२०२०
पुणे- केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेती संबधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत असलेल्या संख्या बळाच्या आधारावर मंजुर करुन घेतले. या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरशः नागवला जाणार असुन तो देशोधडीला लागणार आहे. जागतिकिकरण आणि त्याचमागून अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातुन शेतकऱ्याचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे. अशा या अन्याकारक विधेयकाचा निषेध नोंदवित व या विधेयकाला विरोध म्हणुन दिल्ली येथे गेले एक दिवस चालू असलेल्या बंदला पाठिंबा म्हणून पुणे शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
🔹आंदोलनातील प्रमुख मागण्या
▪️ महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.महाविकास आघाडीची हि भुमिका प्रामाणिक असेल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा व शेतक-र्याच्या शेतमालाला किमान आधारभुत किंमत ( हमी भाव ) मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतुद करावी.आणि त्याची कठोर अमलबजावणी करावी.
▪️ शेतमालाची वाहतुक करण्यासाठी मुख्यतः भारतीय रेल्वे चा वापर होतो.या भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा इराद आहे.खाजगीकरणामुळे शेतमालाची वाहतुक प्रचंड खर्चिक होईल व सर्वसामान्य ग्राहकावर वाढिव भावाचे ओझे लावले जाईल. खाजगीकरणाचा निर्णय केंद्रं सरकारने ताबडतोब रद्द करावा हि मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी करण्यात आली.
सदर आंदोलनात पुणे शहरातील जेष्टे नेते वसंतजी साळवे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते संतोष संखद, प्रदेश सदस्या रोहिणीताई टेकाळे, निर्मलाताई वनशीव, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऋषिकेश नांगरेपाटील, विशाल गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल गुजर, महासचिव महेश कांबळे, संघटक मनोज क्षिरसागर, सह संघटक सतिश रणावरे, प्रवक्ते गौरव जाधव, प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, सदस्य मयुर शिंदे, दिपक ओव्हाळ, अॅड.अरविंद तायडे, विवेक लोंढे बाबासाहेब वाघमारे, सागर सावंत, विनोद शेट्टी शिंदे, प्रदिप रणसौरे, सुबोध गणले, आप्पा गवळी, वफय्याज सय्यद, महेंद्र येरेल्लु, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शुभम चव्हाण, अक्षय बोटेगावकर, युवा आघाडीचे अतुल नाडे, ऒंकार कांबळे, महिला अध्यक्षा सिमाताई भालसेन, अध्यक्षा अनिता चव्हाण, रंजना कांबळे, प्रियंका लोंढे, प्रशांती साळवे, मालती बडेकर, संगिता कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



















