निर्भिड पत्रकार
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी, प्रतिक नळे
चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलभुत मागण्यांसाठी बिआरएसपी विदर्भ प्रदेश महासचिव राजुभाऊ झोडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना घेऊन (दि.28 जुन) ला जिल्हाकारागृह चंद्रपूर पासुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या प्रमुख मांगण्या जबरान जोत शेतकऱ्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे. शेतकऱ्यांचा शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्यात यावा. चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.शेतकऱ्यांना पिककर्ज विनाअट त्वरित उपलब्ध करावे. राज्यातील शेतीविषयक धोरण,शेतकरी आत्महत्या ,जमीन वाटप, गायरान जमीनीचा प्रश्न निकाली काढावा. शेतकरी व शेतमजुर यांना वयाच्या ६० वर्षानतर मासिक ५००० रु पेंशन देण्यात यावी. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांचा मुलांना शेतीपूरक उद्योगाकरिता विनाअट कर्ज उपलब्ध करुण द्यावे. किटकनाशक फवारणीमुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटुबाला १० लाख रुपये सानुग्रह निधी देण्यात यावा. गोसेखुर्द धरणाच्या,हूमन प्रकल्प,लिप्ट योजनचा पाण्याची व्याप्ती वाढवुन चंद्रपूर जिल्हयातील शेतजमीनीला देण्यात यावे अन्यथा भविष्यात उग्र आंदेलन करण्यात येईल.अशा विविध मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चात बिआरएसपी चे राजू झोडे,अशोक बनकर ,विजय गोंडाणे,नभिलास भगत,प्रशांत उराडे,रुषीभाऊ पेटकुले,रुपेश निमसरकार,राजु रामटेके, अजय लिहीतकर,गुरु भगत,महेंन्द्र झाडे,अजय पागडे,अशोक रामटेके, जे.डी. रामटेके,शिला मूंजेवार,प्रित जनुघरे,कमलाबाई मून,इंदू गोरे,सुधा वर्मा,निर्मला रोहिदास तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते.



















