अहमदनगर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१३.०६.१९
जामखेड- शेतक-यांना शिव्या देणारा रावसाहेब दानवेंसारखा निवडून येतोच कसा? असा सवाल करत जामखेड येथील आयोजित सभेत आ.बच्चू कडू बोलत होते.विरोधी पक्षनेतेच जर भाजपला साथ देत असतील, तर सरकारकडून काय अपेक्षा करणार,असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थित केला. ऊस प्रश्न, पाणी, दुष्काळ आदी महत्त्वाच्या मुद्यांवरून सरकारला कडू यांनी चांगलेच धारेवर धरले.ज्या नगरमध्ये उसाच्या भावासाठी लढणा-यांवर गोळ्या चालवल्या जातात त्याच नगरमध्ये कमळ कसे खुलते? असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू पुढे म्हणाले की लोकसभा निवडणूकीचे निकाल पाहता सर्वसामान्य माणसाने कोणत्या विचाराने मतदान केले याचे मला नवल वाटले. शेतक-यांसाठी काम करणारा राजू शेट्टींसारखा खासदार पडतो आणि शेतक-यांना शिव्या देणारा रावसाहेब दानवेंसारखा निवडून येतो’ असे म्हणत ‘ही व्यवस्था अशीच चालू राहिली तर आमच्यासारखा कार्यकर्ता टिकणार नाही.



















