फलटण ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी, गोविंद मोरे
सामाजिक कार्यात नेहमी आग्रेसर असणार्या राजुरी येथील संकल्प फाऊंडेशन च्या वतीने राजुरी चौफुला ते मुंजवडी गावापर्यंत असणार्या ५ किमी रस्त्यावरील अंसख्य खड्डयांचे मुरमीकरण करण्यात आले. रस्त्याची आवस्था फारच दैनीय झाली होती अनेक वेळा रस्त्याची दुरूस्ती ची मागणी केली जात होती, अनेक वर्तमानपत्राने देखील आवाज उठवला होता पण त्या कडे संबधीत विभागाने रस्त्याच्या कामाकडे कानाडोळा केला होता. म्हणून संकल्प फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम हाती घेऊन महीन्यातील एक दिवस श्रमदान नियोजन करण्यात आले .त्या अनुंषगाने राजुरी चौफुला ते मुंजवडी या रस्त्याचे श्रमदान करूण मुरमीकरण करण्यात आले आहे. श्रमदानात सुमारे ६० ते ७० युवकांनी सहभाग घेतला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाबद्दल संकल्प फांऊडेशनचे राजुरी ,मुंजवडी,हनुंमतवाडी,पवारवाडी,गावातील ग्रांमस्थांनी अभिनंदन केले श्रमदानासाठी संकल्प फांऊडेशन चे अध्यक्ष अनिल चव्हान ,उपाध्यक्ष सोमनाथ रणदिवे ,खजिनदार संतोष काशिद , कार्याध्यक्ष गणेश बागाव, संपर्क प्रमुख बिपिन बागाव,अमोल रणदिवे. सकंल्प फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.



















