रत्नागिरी ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी, अनिल माने
दि. २४/०८/१८
रत्नागिरी दि.२२ :- शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची चिपळूण मध्ये सभा झाली.सभा संपल्यानंतर संभाजी भिडेना बाहेर पडण्यास संभाजी ब्रिगेड,आंबडेकरी संघटना आणि बहुजन संघटनांनी विरोध करत चितळे मंगल कार्यालयाबाहेरील सर्व रस्ते अडवले.संध्याकाळी चिपळूणात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते तर यामुळे संभाजी भिडे चितळे मंगल कार्यालयात अडकून पडले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेने आज चिपळूणातील चितळे मंगल कार्यालयात सभेचे आयोजन केले होते.हि सभा खासगी असल्याचे सांगून पत्रकारांना सभागृहात प्रवेश दिला नव्हता.सभा संपण्याच्या वेळेस चिपळूणातील वातावरण तापले.संभाजी ब्रिगेडसह आंबडेकरी संघटना आणि बहुजन संघटनांचे कार्यकर्ते सभागृहाबाहेर जमले.पोलीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले.५०००हजार कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाले.भिडे विरोधात घोषणाबाजी करत भिडेना चिपळूणातून बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा दिला.सभागृहाच्या बाहेरील दोन्ही रस्ते संभाजी ब्रिगेड,आंबडेकरी संघटना आणि बहुजन संघटनांनी रोखून धरले होते .



















