फलटण :(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) दि.१४.०८.१८ येथील सरडे या गावात गेली अनेक दिवसांपासून वाळु व मातीचे अवैध खणण चालु आहे.या विरोधात स्थानिकांनी अनेकदा महसूल विभागाकडे तक्रार केली असुन देखिल महसुल विभाग या गंभिर बाबीकडे अक्षम्य डोळेझाक करत आहे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असुन त्यासाठी वाळु माफिया व महसुल खात्याचे अर्थपुर्ण संबंधच कारणीभूत असल्याची चर्चा देखिल आहे.त्यामुळे या परीसरात माती व वाळुचे राजरोसपणे अखंडपणे खणण चालु आहे. सरडे व परिसरातील या अवैध वाळु व माती उत्खनणामुळे शासनाचा महसुल तर बुडत आहेच पण निसर्गाची देखिल अपरिमित हानी होत आहे.यासंबधी गोविंद मोरे यांनी दि.१३.०८.१८रोजी प्रांताधिकारी फलटण यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदन दिले आहे.आता प्रांताधिकारी स्वतः या प्रकरणात लक्ष देऊन वाळु माफियांवर कारवाई करणार का हा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.



















