सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०७.१९
फलटण- तालुक्यातील सरडे गावातील रस्ते अत्यंत खराब झाले असून दुरूस्ती करून ही रस्त्यांची तिच आवस्था दिसत आहे. जिल्हा परिषद शाळा धायगुडे वस्ती पासुन ते सरडे बंगला,मोरे वस्ती पर्यंतचा रस्ता पावसाळ्याच्या दिवसा मधेतर या रस्त्याने पायी चालणे देखील कठीण होऊन बसले आहे. पावसाळा चालु होण्या अगोदर रस्त्याचे काम पुर्ण झाले होते. पण ग्रामसेवक आणि निवडून दिलेले प्रतिनिधी व रोड काॅनट्रॅक्टरच्या काही साठेलोटेच्या सबंधामुळे रस्त्याची आवस्था मुरुमी करण ऐवजी चिखलाची झाली आहे. असे सरडेगावात चर्चा सुरू आहे. शेतकर्यांना शेती कडे जाण्यासाठी रस्ताच नाही तर गावातील लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी रस्ताच नाही तर काहीनां घराकडे जाण्याचा मार्गच नाही. अशा चिखलाच्या रस्त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे कसे हा मोठा प्रश्न परिसरातील नागरीकांना सतावत आहे. अशा परिस्थीती मधे ग्रामसेवकांना रस्त्याची अावस्था कधी थांबेल हे विचारण्यासाठी नागरिक काॅल करत आहेत पण ग्रामसेवक काॅल घेत नाहीत. तर ग्रामपंचायती मधे गेल्यास निवडून दिलेले प्रतिनिधी, राजकीय पुढारी तर हकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे सबंधीत अधिकारी हे या सरडे गावातील रस्त्याकडे लक्ष देतील का? वाटसरूचे,स्थानिकांचे, शेतकर्यांचे, शालेय विद्यार्थ्यांचे हाल थांबवतील का? अशी अपेक्षा सरडे ग्रामस्थांना लागली आहे.



















