सांगली(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.११.१९
सांगली- एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक जिल्हाध्यक्ष पोपट आण्णा मोरे धनंजय पाटील व कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून धरत ट्रॅक्टरमधील हवा सोडून दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्व साखर कारखाने बंद आहेत. तसेच 23 नोव्हेंबरला कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये पार पडणाऱ्या ऊस परिषदेमध्ये एफआरपीबाबत निर्णय होणार असल्याने, तोपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ न देण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे एफआरपी ठरल्याशिवाय सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार, नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिला आहे.



















