सांगली(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.६.११.१९
जत- सिंदुर गावात सहा महिन्यात दोनवेळा बौद्ध समाजावर हल्ला झाला आहे हे गाव अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून महसूल, पोलिस,समाजकल्याण यांची संयुक्त बैठक या गावात घेऊन स्थळपाहनी करून अहवाल शासनास पाठवण्यासाठी प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर केले यावेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस राज्य सचिव वैभव तानाजी गिते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, सांगली जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाळे, रिपाई पुणे जिल्हा युवती अध्यक्ष सुप्रीयाताई वाघमारे, माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे, सरचिटणीस रवी झेंडे, नावनाथ भागवत उपस्थित होते.



















