निर्भिड पत्रकार
कराड,प्रतिनिधी. सूरज जाधव
दिनांक- १९/०६/२०१८
कराड तालुक्यातील अवैद्य वाळू उपश्यास अभय देवून, शेतकऱ्यांना लाच मागणाऱ्या तालुका तहसील प्रशासना विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रामक झाली आहे. गेल्या ५ दिवसांपूर्वी कोर्टी येथील शेतकरी गणेश पोळ यांना २० हजार रुपये लाच मागणारे तलाठी रमेश लाखे यांचे निलंबन करावे, व अवैद्य वाळू उपसे त्वरीत बंद करुण त्यांच्यावर करवाई करण्याची मागणी स्वाभिमानीच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती, करवाई झाली नाहीतर आंदोलन करण्याचा ईशारा हि देण्यात आला होता.
आज पाच दिवस झाले तरी तलाठया वरती करवाई झाली नसून तालुक्यात पाच ते सहा ठिकाणी नदी च्या मळवी तुन वाळू उपस्या ची परवानगी असताना बेकयदेशीररित्या नदी पात्रतून वाळू उपस्या सुरु आहे. शेतकऱ्यांना लगेच नोटिस देणारे प्रशासन वाळू उपस्या बाबत गंभीर नसल्याने आज स्वाभिमानीच्या वतीने गुरुवारी २१ तारखेला तहसील कार्यालया समोर भिक मांगो आंदोलन करुण जमा झालेले पैसे तहसील प्रशासना ला देण्यात येणार असल्याचे निवेदन आज देण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कामगार नेते अनिल घराळ, मनोज जाधव, लालासो सालुंखे, अमर कदम, योगेश झांबरे उपस्थित होते.



















