निर्भिड पत्रकार
कराड,प्रतिनिधी. सूरज जाधव
स्वर्गीय. रघुनाथ (दादा) जाधव यांच्या पुण्यतिथी निमीत्त जिल्हा परीषद शाळा वाघेश्वर येथे सोमवार दि.२५ रोजी व्यसनमुक्ती शपथविधी, वृक्षारोपण, नवगतांचे स्वागत, वह्या पुस्तके वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. विशेषतः कु.प्रिती दिलीप पाटील यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रेम जाधव यांनी आजन्म निर्व्यसनी राहण्याची शपथ घेतली. यावेळी बोलताना जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे यांनी रघुनाथ (दादा) जाधव यांनी समाजसेवेसाठी केलेल्या धडपडी बद्दलची माहिती सर्वांना दिली. व पुण्यतिथी निमित्त होत असलेले सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या पुण्यतिथी समारोह समितीचे कौतुक केले. यावेळी मा.मानसिंगराव जगदाळे, (जि.प.सदस्य मसुर) निखिल दादा शिंदे, (संस्थापक. अध्यक्ष संगोपन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) दिलीपराव पाटील (जिल्हा अध्यक्ष- ग्राहक पंचायत) उद्योजक मा.अजित पाटील पार्लेकर, गणेश जाधव,(शिक्षक नेते) सरपंच सुरेश क्षीरसागर, मा.संजय सावंत सर, मा.धिरज जाधव(ग्रा.पं.सदस्य, अध्यक्ष रा.वि कॉ.मसुर विभाग) शिवाजी शिंदे,(अध्यक्ष शाळा कमिटी वाघेश्वर) माजी सरपंच राखीताई गाडे, ग्रा.स.आनंदा शिंदे, रमेश जाधव, भानुदास शिंदे, युवराज जाधव, हर्षद कासार. मुख्याध्यापक गाडे सर सर्व शिक्षक, पाडळेश्वर क्रिडा मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जाधव सर व आभार अशोक जगदाळे सर यांनी केले.



















