सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,चंद्रकांत सुतार
दि.२३.०३.२०२०
पाटण- कोरोनामुळे होम क्वारंटाईम प्रवासामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असतानाच होम क्वारंटाईनचा शिक्का असलेला एक व्यक्ती पाटण बस स्थानकात एसटी बस मध्ये बसत असल्याचे आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. पाटण एसटी स्टँड मध्ये पाटण ते कुसरुंड बस मध्ये हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असलेला हा व्यक्ती बसला असल्याचे आढळून आले त्यानंतर बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी याबाबत पाटण तहसील व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांची गाडी पाच मिनिटात एसटी स्टँड मध्ये दाखल झाली पोलिसांनी सदर प्रवाशांस गाडीतून उतरण्यास सांगितले सदर प्रवाशी हा दुबईवरून वरून आला असून त्याला घरातच राहण्याच्या सूचना आहेत मात्र आपण बँकेच्या कामासाठी पाटण मध्ये आल्याचे त्यांने सांगितले त्यावर पाटण पोलिसांनी त्याला घरातच रहा सार्वजनिक ठिकाणी फिरू नका अशा सूचना केल्या.



















