सोलापूर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०५.२०२१
मोहोळ- देशात आणि राज्यात सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना, ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली असताना, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हातील, मोहोळ तालुक्यामधील असं एक घाटणे गाव. या गावातील युवा सरपंचानें मार्चनंतर गावातील रुग्णसंख्य वाढते आहे, हे लक्षात आल्यानंतर, स्वतःचा जीव धोक्यात घालून, जनतेच्या मदतीसाठी सरसावला. टेस्टिंगसाठी असणारा विरोध आणि रोष स्वीकारून गावचा प्रमुख म्हूणन, सामाजिक बांधिलकी, जबाबदारीं म्हूणन ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या मदतीने गाव कोरोनामुक्त करण्यात निर्धार केला.

त्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेत,सकारात्मक राहा, आणि गावाला कोरोना पासून निगेटिव्ह’ ठेवा मोहीम हाती घेतली. ऋतुराजच्या या मोहिमेला ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद लाभला आणि गाव कोरोनामुक्त करण्यात यश आले. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला गावातील कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण वाढू लागले होते. गावात कोरोनाचे दोन मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही परिस्थितीती वेळेत थांबली पाहिजे या दृष्टीने पावलं उचलले, गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराजने रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीचा वापर केला. गावातील जे लोक गर्दीच्या ठिकाणी बाहेरगावी जातात किंवा जनसंपर्क अधिक असलेले व्यवसाय करतात अशा ग्रामस्थांसाठी आवश्यकतेनुसार सर्वांची टेस्टिंग सुरू करण्यात आले.

तसेच गावातील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांचे लसीकरण करून घेणे, आशा वर्कर्सच्या मदतीने वेळोवेळी गावकऱ्यांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासून घेणे, गावातील प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचा समावेश असेलेले ‘कोरोना सेफ्टी कीट’ घरोघरी देण्यात आल्या अशा विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला. गावात विलिगीकरण कक्ष,मिनी कोविड सेंटर सुरू करून सर्व आवश्यक गोष्टींच्या उपलब्धतेबाबत ऋतुराजने विशेष लक्ष दिले. त्याच्या समाज उपयोगी प्रयत्नांना गावकऱ्यांची मोलाची साथ लाभली आणि बघता बघता मे महिन्यात गावातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली व गाव कोरोनामुक्त झाले . सकारात्मकतेने आणि योग्य धोरणांनी आपण कोरोनाला हरवू शकतो हा आदर्श संदेश युवा सरपंचाने आणि घाटणे गावच्या लोकांनी राज्यातील सरपंचाना घालवून दिला.

या कार्याची दखल खुद्द राज्यात मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरे यांनी घेत, ऋतुराज देशमुखचे तोंड भरून कौतुक करत, एक प्रकारे शाबासकीची थापच पाठीवर टाकली आहे. मुख्यमंत्री पुढील काही दिवसात ऋतराजचा राज्यातील सरपंचाशी संवादही घडवून अनु शकतात. सगळीकडे हातबळता असताना या कठीण काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याने विविध क्षेत्रातुन ऋतुराजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



















