उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.११.०५.२०२०
परंडा- ३७दिवसा नंतर जिल्ह्यातील परंडा येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडला असून त्याचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाचे शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. हा रुग्ण स्वतः ड्रायव्हर असून माढा करमाळा नवी मुंबईसह वाशी येथे खरबूज व टरबूज अशी फळे विकायचा त्याच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ३७ दिवसानंतर कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे



















