सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०४.२०२०
पाटण- शहराच्या जवळील असलेल्या कवरवाडी (मुळगाव) येथील सौ.सुनंदा पांडुरंग पवार वय (५०) यांनी आजारपणाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी मुळगाव पुलावरून कोयना नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान या पुलाच्या जवळपास बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्ड व स्थानिक तरुणाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने त्या महिलेला वाचविण्यात अपयश आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती वरून सौ. सुनंदा पांडुरंग पवार यांचा मुलगा संतोष पांडुरंग पवार यांनी याबाबतची फिर्याद पाटण पोलिसात दाखल केली आहे. यात असे म्हटले आहे की सुनंदा पवार या आजारी होत्या त्या आजाराला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली. शहरानजीक मुळगाव (कवरवाडी) हे गाव आहे ह्या मुळगाव कोयना नदीवरील पुलावरील वाहतूक सध्या कोरोना पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे. सौ.सुनंदा पवार या गुरुवारी तेथे अचानक पणे आल्या व त्यांनी कोयना नदीपात्रात उडी घेतली. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले होमगार्ड विजय जाधव व स्थानिक तरुणाने पाण्यात उडी मारून सौ. सुनंदा पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्यांना अपयश आले. या घटनेची नोंद पाटण पोलिसात झाली असून पुढील तपास हवालदार शेवाळे करत आहेत.