निर्भिड पत्रकार
जिल्हा प्रतिनिधी, प्रतीक नळे
बल्लारपूर तालुका येथील कळमना ग्रामपंचायत आणि जि. प. प्रथमिक शाळा कळमना येथील खाली जागेवरती पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर यांच्याद्वारे पाण्याची टाकीचे कामाकरिता २०×१० चे खड्डे खोदुन ठेवण्याच्या कामाला जवळपास १ ते दिड महिन्याच्या कालावधी झालेला असून त्या बांधकामला अजून सुरुवात झालेली नाही आणि सध्या जि. प. शाळा सुरू झालेल्या असून विद्यार्थ्यांची रहदारी शाळेमध्ये वाढली आहे आणि पावसाळा सुरू असल्याने त्या खड्ड्यामध्ये शाळेचे विद्यार्थी पडण्याची शक्यता आहे आणि या कामाची विल्हेवाट आतापर्यंत झालेली नाही करीता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना माहिती देवून सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे करीता संबधित अधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांनी चौकशी करून यावर विशेष तोडगा काढवा अशी ग्रामपंचायत तथा समस्त गावकऱ्यांनी मागणी जोर धरत आहे.



















